Sunday, January 13, 2019

प्रेम करत होतीस तू

दुर असताना बघून हसत होतीस तू,  
समोर आलो कि अबोला धरत होतीस तू 

दिवसातुन थोडं का होईना बोलत होतीस तू
न सांगता कळत होते की प्रेम करत होतीस तू

भेटायला येताना चाँकलेट आणायचीस तू
स्वतः नाही आलीस तर पाठवून द्यायचीस तू 

बस आणि कॉलेज मध्ये मलाच शोधायची तू 
न सांगता कळत होते की प्रेम करत होतीस तू 

मित्र-मैत्रिणीशी माझ्याबद्दल बोलायचीस तू 
माझ्याशी बोलायला नेहमी टाळायचीस तू 

कोणी माझ्याबद्दल वाईट बोललं कि रागवायचीस तू 
न सांगता कळत होते की प्रेम करत होतीस तू 

माझ्यासाठी हे सगळं प्रेम होत तुझं 
आता तरी सांग प्रेम आहे कि नाही तुझं 

फोटो

तिच्यासोबत काढलेला
माझ्याकडं माझा एक 
पण फोटो नाही
मला तेव्हा त्या फोटोची
गरज ही वाटली नाही कधी...

वाटलचं नाही मला कधीचं
आम्ही वेगळं होतोन
मला तिच्या आठवणीत
कधी जगावं लागण
म्हणून कधी मी तिच्यासोबत 
फोटीचं काढला नाही...

खर सांगायचं झालतर मित्रांनो
माझ्याकडं तेव्हा 
साधा मोबाईल होतो
साध्या मोबाईल 
मध्ये कुठं फोटो निघतो राव...

आता वाटत राव मला
तिची आठवण आल्यावर 
पाहिजे होता एकतरी 
फोटो माझ्याकडं
आमच्या दोघांचा

जास्त तर आम्ही 
ऑनलाईनच बोलायचो
फोनवर आम्ही 
कधीतरीचं बोलायचो

मला तिचा आवाज
खूप आवडायचा
डोळ्यात तिच्या मला 
माझा चेहरा दिसायचा

हळूहळू आमचं 
बोलण कमी झालं
कळलचं नाही मला कधी
माझं प्रेम कमी पडलं

नको आता यापुढं 
कुणाला काही 
माझ्या विषयी सांगायला
आली परत कधी ती तर 
म्हणन बसला तु सांगूण लोकांना

आता वाटतं मला पाहीजे
होता राव एक फोटो 
तिच्यासोबत काढलेला
आववणींच्या त्या क्षणांमध्ये 
तीच्यासोबत एक फोटो काढलेला
फोटो मध्ये आम्ही
दोघं ऐकमेकांचे असताना...

आठवणी

मनातील भावना लिहिताना विचारांचा कहर होतो
कल्पनेच्या झाडाला मग शब्दांचा बहर येतो

भावनांना समुद्रातील लाटांप्रमाणे उधाण येतं
विचारांच्या फेसाळणाऱ्या दर्यात मन कसं वाहून जातं

प्रत्येक लाटेतुन शब्द जणू येऊन भेट घेतात 
जाता जाता काव्यरुपी ओळी देऊन जातात

आनंदाचे दिवस सारे डोळ्यातून अश्रू येतात   
विचार करता "त्या" आठवणी अलगद जाग्या होतात 

Sunday, May 27, 2018

माझे मलाच कळत नाही

माझे मलाच कळत नाही आहे, 
मी तुझ्यात ईतका का गुंतलो होतो 

मैत्रीचे हे प्रेम अपुले
नकळतच बहरून आले

सांगितले नाही कधी 
भाव माझ्या मनातले

प्रेमळ मैत्री ही तुझी 
मला प्रेमेचे वेड लावून गेली

निस्वार्थ प्रेम आहे माझे
साथ मजला देशील का ग सखे

एका प्रेमळ शब्दासाठी 
वाट तुझी पाहत होतो

विचार तुझा काय आहे 
सांगना प्राणप्रिये मजला 

निशब्द ओठ सारे सांगून गेले 
प्रेम माझे तू स्वीकार नाही केले

क्षणभर विचार करतो मनात ,
आठवतो ते दिवस जुने मैत्रीचे 

कधी कधी एकांतात विचार करतो ,
का तुझ्यावर मी प्रेम करत होतो

आता ठरवलंय मी प्रेम नाही करायचे 
आयुष्यभर लढायचं आहे आपल्यासाठी 

Tuesday, January 2, 2018

मी शांत आहे

मी शांत आहे, अबोल आहे पण मी हरलो नाही
जग जिंकण्यासाठी कितीतरी क्षण येतील
आयुष्य संपले नाही.
भेटतील किती तरी जण...!!!
मी थकलो नाही पण जरा दम घेतोय म्हणा
पुन्हा झेप घेण्यासाठी, पेटून उठेल एकेक कण...!!!

Sunday, December 17, 2017

प्रेम आहे मैत्रीत

तिची नी माझी मैत्री आहे खास
लागला मला तिच्या प्रेमाचा ध्यास

कसे सांगू मी तिला भाव माझ्या मनातले
प्रेम आहे मैत्रीत माझ्या बेधुंद जाहलेले

साथ असावी मला तिच्या प्रेमरूपी मैत्रीची
मनी आहेत गोड स्वप्ने माझ्या जी लपलेली

सांगावे कसे तिला तुज वाचून दिसे न काही
स्वीकार कर प्रेम माझे कधी न संपणारे तुझ्याचसाठी

Wednesday, December 13, 2017

मैत्रीण

मैत्रीण तर माझी तू खास होतीस पण तुझे प्रेम मला कधी मिळालंच नाही.
तुला विसरता विसरता अजुनच आठवायला लागलो
तुला विसरणं तर जमलंच नाही पण स्वत:ला मात्र विसरायला लागलो