अरे अरे पाऊसा !!!
किमान बरस तरी आज! जून चालला उलटूननिदान बाळग थोडी लाज!
सृष्टीचाच नियम म्हणूनतुलाही घे लाच!दोन पैसे जास्ती घेऊन
मोरांसाठी नाच!!
त्याचा सुद्धा तुझ्यावरविश्वास नाही राहिला!फुलोरा करून पिसांचाडिजेवर नाचू लागला !
काय तुझा पूर्वीचा तोहोता कसा थाटचातकं सुद्धा तुझी आतापहात नाही वाट
तहानलेला कावळा आतागोष्टीं मध्येच राहीला,तुला वैतागुन शेवटी बिसलरी पिऊ लागला!!
ढग घेऊन काळेकुट्टविजांसोबत गरज, सवाल तुझ्या इमेजचाआता तरी बरस !!!!आता तरी बरस !!!
No comments:
Post a Comment