Thursday, September 24, 2015

टाईमपास कधी जमलाच नाही....

आपला प्रेम तुला समजलाच नाही..
टाईमपास आपण केलाच नाही ..

वळुन तरबघायचा होता जरा 
आपल्याला आता हसताच येत नाही..

नाका सोडला कट्टा रुसला 

तुझ्या जाण्याने बदल कसा झाला..

उनाड दिवसाच्या टवाळक्या 

आता परत कुणालाच दिसल्या नाही...

आपण असा बदलेल वाटायचं नाही तु बदलवलंस
ग आपल्याला आता आपला काय खरं नाही... 


तसा तर मी मरणार नाही पण
जगण्यातही मजा उरला नाही ..


साला आपल्याला कळलाच नाही आपण
खराखुरा प्रेम केला टाईमपास कधी जमलाच नाही....

Monday, September 14, 2015

माझी चुकी नाही

माझी चुकी नाही कि मी तुझ्याकडे सारखा बघतnराहतो ..
माझी चुकी नाही कि मी तुला सारखा कॉल आणि मेसेज करतो..
माझी चुकी नाही कि मी तुला इतका लाईक करतो...
माझी एवढीच चुकी आहे कि मी तुझ्यावर माझ्यापेक्षा हि खूप खूप खूप जास्त प्रेम करतो...

Friday, September 11, 2015

तर ह्या जगाची सुध्दा मला गरज नाही

पाण्यापेक्षाही खळखळुण तुझ हसन, फुलापेक्षाही नाजुक तुझ लाजण,
मला तुझीच साथ हवी आहे, तुला विसरायचे म्हटले तरी विसरु शकत नाहि,
तुझे स्वप्न पडल्याशिवाय रात्र सरत नाही, आज कळल मला आपले वाटणारे सगळेच मनापासुन आपले नसतात,
त्यांना हवं ते मिळाल की ते आपल्याला सोडुन निघालेले असतात, तुझ्यावर इतक प्रेम करेन की या जगात कोणिच कोणावर केल नसेल,
दुर गेलीस तरी तुझ्या आठवणीत माझ्याशिवाय कोणीच नसेल,
हसतेस एवढी छान की हसत रहायला शिकवलेस तु,
बोलतेस एवढी छान की बोलत रहायला शिकवलेस तु,
जर तुझे स्मितहस्य मला मिळाले तर मला फुलांची गरज नाही,
जर तुझा आवाज मला मिळाला तर मधूर संगिताची मला गरज नाही, जर तु माझ्याशि बोललीस तर दुसर काही ऐकण्याची मला गरज नाही, जर तु माझ्या बरोबर आहेस तर ह्या जगाची सुध्दा मला गरज नाही

प्रेम प्रेम तरी वेगळ काय असत

नेहमीच विचारायची ती मला का प्रेम करतो तू एवढं
सागराच्या खोली एवढं का ओढून घेतो मला सागराच्या लाटा एवढं नेहमीच सांगायची ती मला
हिप्नोटाइज करतोस तू मला स्वप्नातही माझ्या फक्त तूच का दिसतो मला
वाटायच सांगाव तिला अग वेडे प्रेम काय सांगून केले जाते 
बुडायला काय पाणीच लागतं अथांग काय फक्त सागरच असतो
अग त्या लाटाचही प्रेम असतं चंद्रावर चंद्रही भारावतो ह्या लाटाना
म्हणूनच त्याही उफाणतात पोर्णिमा आणि अमावस्येला
प्रेम प्रेम तरी वेगळ काय असत तुझ्या श्वासातच आता माझा श्वास असतो
तुझ्या असण्यातच आता माझं असण असते म्हणूच सांगतो माझं तुझ्यावर प्रेम आहे ह्या सागराच्या अंतापर्यंत

तुझ्यावर प्रेम करण्यासाठी

तुझ्याकड़े पहाण्याचा तो पहिला क्षण
आज मला खुप आठवतो..


तुझ्यासाठी वेडा होणारा तो माझा मन
मला खुप हसवतो..


तुझ ते माझ्या कड़े पाहण
हळूच काहीतरी इशारे करण
माझ्याकड़े बघून हसण..


अचानक नजर फिरवून लाजन
अस वाटत क्षणभर थांबाव तुझ्यासाठी..


तुझ्या त्या प्रेमळ सोबतीसाठी.
तुझ्या सोबत जीवन जगण्यासाठी..


तुझ्यावर प्रेम करण्यासाठी

Thursday, September 3, 2015

खरे प्रेम निभवण, आहे खूप कठीण,

प्रेम करतो हे सांगण, तसे अगदी सोपे आहे, पण खरे प्रेम निभवण, आहे खूप कठीण,
बोलायला तर लोक,...\ सहजच बोलून जातात , ... वेळ येते निभवण्याची खरी, तर म्हणतात आपल्यात, आता दुरीच बरी....... ..!!

स्वप्न

माझं स्वप्न आहे, तुझ्यासोबत जगण्याचं,
हातात हात घेऊन,एकाच दिशेन चालण्याचं, माझं स्वप्न आहे,तुला जवळून पाहण्याचं,
जवळ तुला घेऊन,एकदा मिठीत घेण्याचं,
माझं स्वप्न आहे,तुझ्या सोबत राहण्याचं,
... छोठसं घरट बांधून,त्यात दोघांनीच राहण्याचं,
माझं स्वप्न आहे,तू स्वप्न बघण्याचं, आणि दोघांनी मिळून,ती पूर्ण करण्याचं,
माझं स्वप्न आहे,मी चित्र रेखाटण्याचं,
त्यात रंग भरून,ते तू रंगवण्याचं

फक्त तू

शांत शांत दिसणारी, अन खूप गोड हसणारी... कधी कधी अबोल, तर कधी कधी खूप बोलणारी... कसल्यातरी विचारात, नेहमीच गुंग असणारी... अन कोणाला ही फक्त एक नझर पाहताच, त्याला भुरळ पाडणारी..... ............." तू "............. कोणावरही न चिडणारी, अन सर्वाना समजून घेणारी... स्वतःच दुखः नेहमीच लपवणारी, अन त्या चंद्राला हि फक्त, एकटक पाहत बसणारी .... ............" तू "............ सारयांच्या नकळत, त्या चंद्राला हि वेड लावणारी.. घारया डोळ्यात तुझ्या, त्या चंद्राला हि कैद करणारी... चंद्राला हि तुझ्यात, त्याचीच चांदणी दिसणारी... अन तुझ्या इतकी सुंदर, त्याचीही चांदणी असावी.. अस त्या चंद्राला, नेहमीच वाटायला लावणारी.. ............" तू " ............ .....फक्त आणि फक्त तू..

प्रॉमिस

एक प्रॉमिस माझ्या कडून जेवढे तुलासुख देता येईल तेवढे देईन । काही ही झाले तरी साथ मी फक्त तुला च देईन.. एक प्रॉमिस हवाय तुझ्या कडून असच माझ्या मिठी मध्ये हरवशील असच नेहमी फक्त मला आठवशील । दुखात न कधी रडशील सुखात न कधी मला विसरशील.. एक प्रॉमिस मी नेहमी तुला सुखात ठेवीन एक क्षण सुद्धा माझ्या पासून दूर न करीन । दिलेले प्रॉमिस जीवन भर निभावेन केलेले प्रेम जन्मभर जपेन..

तोच खरा प्रेमाचा वारसदार

सर्वांनाच प्रेम इतक्या सहजा सहजी मिळाल असते तर कुणी प्रेम केलच नसते.. . प्रेम करायला भाग्य लागत ते असच कुणाला हि मिळत नसते... . . कारण ते प्रेम असते स्वतः हून ते कुणासमोर झुकत नसते झुकते ते प्रेम नसते... . काळानुसार ते हि नशिबाची परीक्ष्या घेत असते .. . . त्यात जो पास होतो तोच खरा प्रेमाचा वारसदार असतो ..!!