Friday, September 11, 2015

प्रेम प्रेम तरी वेगळ काय असत

नेहमीच विचारायची ती मला का प्रेम करतो तू एवढं
सागराच्या खोली एवढं का ओढून घेतो मला सागराच्या लाटा एवढं नेहमीच सांगायची ती मला
हिप्नोटाइज करतोस तू मला स्वप्नातही माझ्या फक्त तूच का दिसतो मला
वाटायच सांगाव तिला अग वेडे प्रेम काय सांगून केले जाते 
बुडायला काय पाणीच लागतं अथांग काय फक्त सागरच असतो
अग त्या लाटाचही प्रेम असतं चंद्रावर चंद्रही भारावतो ह्या लाटाना
म्हणूनच त्याही उफाणतात पोर्णिमा आणि अमावस्येला
प्रेम प्रेम तरी वेगळ काय असत तुझ्या श्वासातच आता माझा श्वास असतो
तुझ्या असण्यातच आता माझं असण असते म्हणूच सांगतो माझं तुझ्यावर प्रेम आहे ह्या सागराच्या अंतापर्यंत

No comments:

Post a Comment