आयुष्यात जगण्यासाठी खुप
काही असते
फक्त कोणाची तरी साथ
असावी लागते...
:माझे ही काहीसे तसेच
काही गोष्टी पूर्ण आहेत
आणि बऱ्याच
गोष्टी अधूऱ्याच आहेत...
:आयुष्य अपूर्ण असतानाच
जगावे म्हणतात
पूर्ण होईल ते जीवन कसले...!
त्यामुळ मी स्वतः अजून
अधूराच राहिलोय...
:जीवनाच्या या एकमार्गी वाटेवर
मी एकटाच चालत आहे
मलाही कोणाची तरी सोबत
हवी आहे...
:शेवट पर्यंत आयुष्याची
होशील का सोबतीण
माझी..?
लढवण्यासाठी हा जीवनकिल्ला
हवी तुझी साथ मला...
No comments:
Post a Comment