कधी न संपणारी
फक्त मैत्रीच असत्ते
मैत्रीमधले प्रेमही तसेच असते
... कधीच न संपणारे
मैत्रीमध्ये हसवा रुसवा असतो
प्रेमात फक्त रुसवा अन फसवा असतो
मैत्री नाजूक धागा आणि अटूट बंधन
प्रेम कीतीही नाजूक पण टूटतेच कधीतरी
प्रेम ह्याने केले प्रेम त्याने केले
प्रेम करणारा एकटाच असतो ना
मैत्री मी केली का त्याने केली
मैत्री तिधेही निभावतात....
मैत्रीनेच प्रेमाला सुरूवात होते
ऐकल होते पण खरच आहे की..
माझ्या मैत्रीत प्रेम आहे...
पण माझ्या प्रेमात मैत्री कधीच नसणार...
फक्त प्रेम आणि फक्त प्रेमच असेल..
तुम्हाला कोणते प्रेम आवडते...
प्रेमात मैत्री असते मैत्रीनंतर प्रेम असते
मैत्रीपेक्षा जास्त प्रेम की प्रेमापेक्षा जास्त मैत्री?
मग तूम्ही काय मागाल... मैत्री की प्रेम ?
Monday, October 5, 2015
मैत्रीचा हक्क तरी माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस.
मैत्रीचा हक्क तरी माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस.
प्रेम ही कल्पना मनाला स्पर्श करून जाते. ही भावनाच निराळी आहे. प्रेमाची व्याख्या सगळे करतात. माझी व्याख्या वेगळी आहे. एकमेकांना समजून घेतलं, विश्वास ठेवला, विचारांची तडजोड केली, तरच संसार सुखाचा होतो. मी तुझ्यावर प्रेम केलं. तुला समजून घेतलं, तुझ्यावर विश्वासही ठेवला. तुला मी आवडत होते, तर का तुला असं वाटलं, की आपलं प्रेम संपवून टाकू या? तू मला सोडण्याचा निर्णय घेतलास. असं का वागलीस? काय कारण होतं, माझं प्रेम तोडण्याचं? का मला टाळत होतीस? हे सर्व प्रश्न माझ्या मनात घर करून आहेत. मी तुला विचारलंही, पण तू मला उत्तरं दिलस पण ते हि ठाम हो असे नाही . म्हणून यापुढे हा प्रश्न तुला विचारणार नाही. तू स्वत:हून सांगशील, याची वाट बघेन. प्रेम तोडण्याचं कडू विष मला प्यायला लावलंस. पण तू सुखात राहावंस, एवढीच माझी इच्छा आहे. तुला आठवतात, आपण सोबत घालवलेले दिवस? हे दिवस माझ्यासाठी अनमोल क्षण आहेत आणि यापुढेही असतील. आयुष्यात कधीही विसरता येणार नाहीत. तुला वाटत असेल, की मी खोटं बोलते. पण यातला शब्दन्शब्द खरा आहे. माझ्या आयुष्यात तुला किती महत्त्वाचं स्थान आहे, हे तुला माहीत नाही. माझं प्रेम खरं आहे गं तुझ्यावर. मला तुझी मैत्री गमवायची नाही. प्रेमाआधी जी मैत्री होती, ती मला हवी आहे. मनातलं सर्व काही तुला सांगितलं असतं, पण कदाचित तू ऐकलंही नसतंस. एकाच ग्रुपमध्ये राहून तुला माझ्याशी बोलायला वेळ मिळत नाही ना! म्हणून माझ्या मनातला भावना तुला पत्राने कळवण्याचा निर्णय घेतला. हे सर्व मी तुझ्यासाठीच केलं. मी तुझ्यातली प्रियसी गमावली. तुझ्यातली मैत्रीण गमवायची नाही. तू सांगशील, ते मान्य करेन, पण माझ्याशी मैत्री तोडू नको. ही मैत्री निर्मळ, निखळ असेल. प्रेमाचा एकही विषय मी काढणार नाही. तू सुखात राहा, हीच प्रार्थना मी रोज करतो आणि करत राहिन. तुला कधीच विसरू शकत नाही. ज्याला आपण विसरतो, त्याची आठवण येते. तू नेहमी माझ्या मनात राहशील . तुझ्या सुखासाठी काहीही करायला तयार आहे. म्हणून तर प्रेम संपवून टाकलं, तरी तुझी मैत्री नाही संपवली. तुला माझ्या या भावना कळल्या, तर मी सर्व काही जिकलं. माझं प्रेम आजही तूच आहेस, उद्याही तूच राहशील, तू माझ्यासोबत राहा किंवा नको राहू, आयुष्यभर तुझ्या आठवणी माझ्यासोबत राहतील. प्रेम करते तुझ्यावर, तिरस्कार करू नकोस, आयुष्यात माझ्याशी कधीही बोलणं सोडू नकोस. सर्व सहन करेन मी, पण तुझा अबोला नाही. सदैव सुखात राहा, आयुष्यात पुढे जात असताना एकदा तरी मागे वळून पाहा. उभा असेल तिथे फक्त तुझा मित्र, मैत्रीचा हक्क तरी माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस.-
तुझा मित्र,

माझ तुझ्यावर खूप प्रेम आह
एवढे एक करशील ना ?
शब्दांत नाही सांगता येणार डोळ्यांतुन समजुन घेशील ना ?
अस्वस्थ होइन मी जेव्हा धीर मला देशील ना ?
माझ्याही नकळत दुखावले तुला तर माफ़ मला करशील ना ?
ओघळले अश्रु माझे तर अलगद टिपून घेशील ना ?
आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना ?
सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना ?
चुकतोय मी असे वाटले कधी तर हक्काने मला सांगशील ना ?
हरवलो मी कुठे कधी जर सावरून मला घेशील ना ?
कितीही भांडलो आपण तरीही समोर आल्यावर सारे विसरून जाशील ना ?
मी आता विसरणे शक्य नाही तुला तू मला लक्षात ठेवशील ना ?
जीव तयार आहे तुझ्यासाठी गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?
मला तुझी गरज आहे, हे न सांगता ओळखशील ना ?
आजवर तुझ्यासाठी काही नाही करू शकलो, पण माझ्यासाठी एवढे एक करशील ना ?
तुझ्यासाठी मी कित्येकांपैकी एक असलो तरी माझ्यासाठी.......... तूच एक असशील ना ?
तुझ्या मैत्री खातर
हाकेला तुझ्या मी साद देईन,
मैत्रीला आपल्या आवाज देईन,
असलो सात समुद्र पार तरीही,
आपल्या मैत्रीसाठी मी धावत येईन...
आणि...
आणि जर असलो त्या देवा कडे,
तर मित्र,
तुझ्या मैत्री खातर ,
मी त्या देवाशी हि भांडून येईन...
मी त्या देवाशी हि भांडून येईन...
मैत्रीला आपल्या आवाज देईन,
असलो सात समुद्र पार तरीही,
आपल्या मैत्रीसाठी मी धावत येईन...
आणि...
आणि जर असलो त्या देवा कडे,
तर मित्र,
तुझ्या मैत्री खातर ,
मी त्या देवाशी हि भांडून येईन...
मी त्या देवाशी हि भांडून येईन...
का तीने मैत्री केली..
का तीने मैत्री केली..
ती वादळा सारखी आली..
आणि डोळ्यात पाणी ठेऊन गेली..
एकट्याला सोडून जाण्यासाठी का..?
का तीने मैत्री केली..
तीचे येनं मला कळले नाही..
तीचं जानं मला कळले नाही..
शुद्धीवर आलो तेव्हा कळले..
माझ्याकडे काहीच उरले नाही..
तीच्या साठी झुरायचं..
तीच्या साठी मरायचं..
का असं होतंय..
शेवटी आपणचं आपलं उरायचं..
तीच्या साठी पाहिलेले स्वप्न..
तीच्यावर ठेवलेला विश्वास..
ती सहज तोडून गेली..
एकट्याला सोडून जाण्यासाठी..?
का तीने मैत्री केली..
ती वादळा सारखी आली..
आणि डोळ्यात पाणी ठेऊन गेली..
एकट्याला सोडून जाण्यासाठी का..?
का तीने मैत्री केली..
तीचे येनं मला कळले नाही..
तीचं जानं मला कळले नाही..
शुद्धीवर आलो तेव्हा कळले..
माझ्याकडे काहीच उरले नाही..
तीच्या साठी झुरायचं..
तीच्या साठी मरायचं..
का असं होतंय..
शेवटी आपणचं आपलं उरायचं..
तीच्या साठी पाहिलेले स्वप्न..
तीच्यावर ठेवलेला विश्वास..
ती सहज तोडून गेली..
एकट्याला सोडून जाण्यासाठी..?
का तीने मैत्री केली..
कस ओळखाव मी काय तुझ्या मनात आहे
कस ओळखाव मी काय तुझ्या मनात आहे
कस कळेल मला काय तुझ्या डोळ्यात आहे.
नजरा मिळवण्या आधीच नजर चुकवतेस तु
कसे ओळखावे कोणते शब्द बंद ओठात आहे.
मी शोधतो जागा माझी सदा तुझ्या भोवताली
पण हे मात्र खर की तु माझ्या काळजात आहे.
सा-या जरी बंद वाटा माझ्या मुक्या शब्दांच्या
परी तु समजुन घे आयुष्य माझ तुझ्यात आहे.
तुला मागुही शकत नाही मी आज तुझ्यापासुन
प्रश्न कोणताच नाही सार काही तुझ्या उत्तरात आहे.
हो आज या नात्याला नाव अस कोणतच नाही
आणि कशाला हव नाव अस काय नावात आहे.
मला फ़क्त तु हवी आहेस आणी तुझा श्वास
श्वासाशिवाय जगणा-या काय या देहात आहे.
कधी तरी सागं भावना पोहचल्या मनापर्यंत
कळालच नाही तर काय अर्थ या काव्यात आहे.

Subscribe to:
Posts (Atom)