Monday, October 5, 2015

माझ तुझ्यावर खूप प्रेम आह

एवढे एक करशील ना ? 

शब्दांत नाही सांगता येणार डोळ्यांतुन समजुन घेशील ना ?
अस्वस्थ होइन मी जेव्हा धीर मला देशील ना ? 
माझ्याही नकळत दुखावले तुला तर माफ़ मला करशील ना ? 
ओघळले अश्रु माझे तर अलगद टिपून घेशील ना ? 
आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना ? 
सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना ? 
चुकतोय मी असे वाटले कधी तर हक्काने मला सांगशील ना ? 
हरवलो मी कुठे कधी जर सावरून मला घेशील ना ? 
कितीही भांडलो आपण तरीही समोर आल्यावर सारे विसरून जाशील ना ?
मी आता विसरणे शक्य नाही तुला तू मला लक्षात ठेवशील ना ? 
जीव तयार आहे तुझ्यासाठी गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ? 
मला तुझी गरज आहे, हे न सांगता ओळखशील ना ? 
आजवर तुझ्यासाठी काही नाही करू शकलो, पण माझ्यासाठी एवढे एक करशील ना ? 
तुझ्यासाठी मी कित्येकांपैकी एक असलो तरी माझ्यासाठी.......... तूच एक असशील ना ?

No comments:

Post a Comment