Thursday, August 17, 2017

खरचं प्रेम होतं तुझ्यावर !!

प्रेम करणं खूप सोपं असतं
पण ते सर्वांनाच जमत नसतं...

तरीही प्रेम सगळेच जण करतात...
काही जिंकतात तर काही हरतात ...

प्रेमात सगळ्यांचीच नजर आतुर असते
परंतु त्या प्रेमाची भाषाच कळत नसते

मी ही करत होतो प्रेम तुझ्यावर !!
पण तुला समजावू शकलो नाही आजवर

माझ्या मनातील प्रेम मी व्यक्त केलं
तू मात्र त्याचं उत्तर नाही दिलं

मी वाट पाहत राहिलो
तू न बोलता निघून गेलीस

आता माझ्या नशिबी हेच लिहिलेलं असावं
तू सुखात राहावं अन मी त्यात माझं सुख मानावं


No comments:

Post a Comment