Thursday, August 17, 2017

तिचा होकार कधी कळलाच नाही

तिचा होकार कधी कळलाच नाही
मी मात्र तिच्यावर प्रेम करत राहिलो

तीची नव्हती पण माझी साथ होती
मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती

ती चमकणा-या ता-यांच्या प्रकाशात होती
मी आजवर कदीलांच्या उजेडात जगलो

तीचा प्रवास होता मोठ्या महामार्गावरचा
माझी ती बिचारी लहान पायवाट होती

तिच्या स्वप्नांना दोरखडं जखडलेले नेहमी
माझी कधीही सुटणारी निसरटी गाठ होती

तीच सुखांशी नेहमी अतूट नातं गुफ़लेलं
माझ्या वाट्याला दुःखंच भरमसाठ होती.

तिची नेहमी साखर झोपेत असायची
मी डोळे मिटले नाही तरी माझी पहाट असायची

तिच्या ओठी नेहमी हसु उमलायच सुखाच
माझ्या डोळ्यानां नेहमी आसवांची साथ होती

तिने कधी हात जोडले नाहीत कशासाठी देवापुढे
तीच्यासाठी देवळात नेहमी माझीच गस्ती होती

ती आज जीवनात खुश आहे माझ्याशिवाय
मी अजूनही तिच्या सुखासाठी प्रार्थना करतोय.

No comments:

Post a Comment