Saturday, November 14, 2015

नेहमीच विचारायची ती मला का प्रेम करतो तू एवढं सागराच्या खोली एवढं का ओढून घेतो मला सागराच्या लाटा एवढं नेहमीच सांगायची ती मला हिप्नोटाइज करतोस तू मला स्वप्नातही माझ्या फक्त तूच का दिसतो मला वाटायच सांगाव तिला अग वेडे प्रेम काय सांगून केले जाते बुडायला काय पाणीच लागतं अथांग काय फक्त सागरच असतो अग त्या लाटाचही प्रेम असतं चंद्रावर चंद्रही भारावतो ह्या लाटाना म्हणूनच त्याही उफाणतात पोर्णिमा आणि अमावस्येला प्रेम प्रेम तरी वेगळ काय असत तुझ्या श्वासातच आता माझा श्वास असतो तुझ्या असण्यातच आता माझं असण असते म्हणूच सांगतो माझं तुझ्यावर प्रेम आहे ह्या सागराच्या अंतापर्यंत
मी ही प्रेम केले होते त्याच्यावर ,
पण त्याला ओळखता आले नाही. 
मी तर नेहमी त्याचीच होते , 
पण त्याला माझे होता आले नाही. 
माज्या मनातील खरे प्रेम त्याला कधीच पाहता आले नाही , 
त्याला विरहाच्या दुखातून अजुन बाहेर पड़ता आले नाही. 
खुप प्रयत्न करून देखिल त्याला विसरता आले नाही. 
तो सोडून गेला तरी मला त्याला सोङताच आले नाही 
४ चोघीत माला कधी मोकले हसता आले नाही 
७ पावले अजुन त्याला माज्या बरोबर चलता आले नाही 
७ जन्माचा जोड़ीदार ज्याला म्हणाले त्याला या एका जन्मात माजे का होता आले नाही?
आयुष्यात प्रेम केलं होतं, कुणालातरी आपलं आयुष्यचं देऊ केलं होतं.. म्हणतात, प्रेम करणं सोप असतं.. ते व्यक्त करणं कठीण असतं.. प्रेम पहाणं सोप असतं, ते समजून घेणं कठीण असतं.. आणि हेचं समजून घ्यायचं होतं, म्हणून, आयुष्यात प्रेम केलं होतं.. कुणालातरी आपलं आयुष्यच देऊ केलं होतं.. असतो का प्रेमात खरचं आनंद का नुसतचं, I Love You म्हणायचं असतं ? विरहात तिच्या बुडून मरायच असतं, की फक्त I Miss You म्हणायचं असतं ? हेचं बघायचं होतं म्हणूनचं, आयुष्यात प्रेम केलं होतं, कुणालातरी आपलं आयुष्यच देऊ केल होतं.. म्हणुनचं तिच्याजवळ व्यक्त करणं ठरवलं, आणि व्यक्तही केल होतं.. पण ????? तिला माझं तुझ्यावर प्रेम नाही, असं म्हणायला काहीचं वाटलं नव्हतं.. असतात खरचं अशी माणसं या जगात, हे कधी मी पाहिलं नव्हतं.. झगडत होतो तिच्याकडून ते, I Love You हे तीन शब्द ऐकण्यासाठी.. कधी तिच्या आठवणीतं मरत होतो, तर कधी मरुनचं जगत होतो.. आणि कदाचित हेचं, माझ्या मनाला अनुभवयाचं होतं.. म्हणूनचं आयुष्यात प्रेम केलं होतं, कुणालातरी आपलं आयुष्यच देऊ केलं होतं.... thats Why.. माझ्या नशिबात प्रेमच नाही.

Monday, October 5, 2015

मग तूम्ही काय मागाल... मैत्री की प्रेम ?

कधी न संपणारी
फक्त मैत्रीच असत्ते
मैत्रीमधले प्रेमही तसेच असते
... कधीच न संपणारे

मैत्रीमध्ये हसवा रुसवा असतो
प्रेमात फक्त रुसवा अन फसवा असतो
मैत्री नाजूक धागा आणि अटूट बंधन
प्रेम कीतीही नाजूक पण टूटतेच कधीतरी

प्रेम ह्याने केले प्रेम त्याने केले
प्रेम करणारा एकटाच असतो ना
मैत्री मी केली का त्याने केली
मैत्री तिधेही निभावतात....

मैत्रीनेच प्रेमाला सुरूवात होते
ऐकल होते पण खरच आहे की..
माझ्या मैत्रीत प्रेम आहे...
पण माझ्या प्रेमात मैत्री कधीच नसणार...
फक्त प्रेम आणि फक्त प्रेमच असेल..

तुम्हाला कोणते प्रेम आवडते...
प्रेमात मैत्री असते मैत्रीनंतर प्रेम असते
मैत्रीपेक्षा जास्त प्रेम की प्रेमापेक्षा जास्त मैत्री?
मग तूम्ही काय मागाल... मैत्री की प्रेम ?

मैत्रीचा हक्क तरी माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस.

मैत्रीचा हक्क तरी माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस.

           प्रेम ही कल्पना मनाला स्पर्श करून जाते. ही भावनाच निराळी आहे. प्रेमाची व्याख्या सगळे करतात. माझी व्याख्या वेगळी आहे. एकमेकांना समजून घेतलं, विश्वास ठेवला, विचारांची तडजोड केली, तरच संसार सुखाचा होतो. मी तुझ्यावर प्रेम केलं. तुला समजून घेतलं, तुझ्यावर विश्वासही ठेवला. तुला मी आवडत होते, तर का तुला असं वाटलं, की आपलं प्रेम संपवून टाकू या?  तू मला सोडण्याचा निर्णय घेतलास. असं का वागलीस? काय कारण होतं, माझं प्रेम तोडण्याचं? का मला टाळत होतीस? हे सर्व प्रश्न माझ्या मनात घर करून आहेत. मी तुला विचारलंही, पण तू मला उत्तरं दिलस पण ते हि ठाम हो असे नाही . म्हणून यापुढे हा  प्रश्न तुला विचारणार नाही. तू स्वत:हून सांगशील, याची वाट बघेन. प्रेम तोडण्याचं कडू विष मला प्यायला लावलंस. पण तू सुखात राहावंस, एवढीच माझी इच्छा आहे. तुला आठवतात, आपण सोबत घालवलेले दिवस?  हे दिवस माझ्यासाठी अनमोल क्षण आहेत आणि यापुढेही असतील. आयुष्यात कधीही विसरता येणार नाहीत. तुला वाटत असेल, की मी खोटं बोलते. पण यातला शब्दन्शब्द खरा आहे. माझ्या आयुष्यात तुला किती महत्त्वाचं स्थान आहे, हे तुला माहीत नाही. माझं प्रेम खरं आहे गं तुझ्यावर. मला तुझी मैत्री गमवायची नाही. प्रेमाआधी जी मैत्री होती, ती मला हवी आहे. मनातलं सर्व काही तुला सांगितलं असतं, पण कदाचित तू ऐकलंही नसतंस. एकाच ग्रुपमध्ये राहून तुला माझ्याशी बोलायला वेळ मिळत नाही ना! म्हणून माझ्या मनातला भावना तुला पत्राने कळवण्याचा निर्णय घेतला. हे सर्व मी तुझ्यासाठीच केलं. मी तुझ्यातली प्रियसी गमावली. तुझ्यातली मैत्रीण गमवायची  नाही. तू सांगशील, ते मान्य करेन, पण माझ्याशी मैत्री तोडू नको. ही मैत्री निर्मळ, निखळ असेल. प्रेमाचा एकही विषय मी काढणार नाही. तू सुखात राहा, हीच प्रार्थना मी रोज करतो आणि करत राहिन. तुला कधीच विसरू शकत नाही. ज्याला आपण विसरतो, त्याची आठवण येते. तू नेहमी माझ्या मनात राहशील . तुझ्या सुखासाठी काहीही करायला तयार आहे. म्हणून तर प्रेम संपवून टाकलं, तरी तुझी मैत्री नाही संपवली. तुला माझ्या या भावना कळल्या, तर मी सर्व काही जिकलं. माझं प्रेम आजही तूच आहेस, उद्याही तूच राहशील, तू माझ्यासोबत राहा किंवा नको राहू, आयुष्यभर तुझ्या आठवणी माझ्यासोबत राहतील. प्रेम करते तुझ्यावर, तिरस्कार करू नकोस, आयुष्यात माझ्याशी कधीही बोलणं सोडू नकोस. सर्व सहन करेन मी, पण तुझा अबोला नाही. सदैव सुखात राहा, आयुष्यात पुढे जात असताना एकदा तरी मागे वळून पाहा. उभा असेल तिथे फक्त तुझा मित्र, मैत्रीचा हक्क तरी माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस.-

तुझा मित्र,

माझ तुझ्यावर खूप प्रेम आह

एवढे एक करशील ना ? 

शब्दांत नाही सांगता येणार डोळ्यांतुन समजुन घेशील ना ?
अस्वस्थ होइन मी जेव्हा धीर मला देशील ना ? 
माझ्याही नकळत दुखावले तुला तर माफ़ मला करशील ना ? 
ओघळले अश्रु माझे तर अलगद टिपून घेशील ना ? 
आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना ? 
सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना ? 
चुकतोय मी असे वाटले कधी तर हक्काने मला सांगशील ना ? 
हरवलो मी कुठे कधी जर सावरून मला घेशील ना ? 
कितीही भांडलो आपण तरीही समोर आल्यावर सारे विसरून जाशील ना ?
मी आता विसरणे शक्य नाही तुला तू मला लक्षात ठेवशील ना ? 
जीव तयार आहे तुझ्यासाठी गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ? 
मला तुझी गरज आहे, हे न सांगता ओळखशील ना ? 
आजवर तुझ्यासाठी काही नाही करू शकलो, पण माझ्यासाठी एवढे एक करशील ना ? 
तुझ्यासाठी मी कित्येकांपैकी एक असलो तरी माझ्यासाठी.......... तूच एक असशील ना ?

तुझ्या मैत्री खातर

हाकेला तुझ्या मी साद देईन,
मैत्रीला आपल्या आवाज देईन,
असलो सात समुद्र पार तरीही,
आपल्या मैत्रीसाठी मी धावत येईन...
आणि...
आणि जर असलो त्या देवा कडे,
तर मित्र,
तुझ्या मैत्री खातर ,
मी त्या देवाशी हि भांडून येईन...
मी त्या देवाशी हि भांडून येईन...

का तीने मैत्री केली..

का तीने मैत्री केली..
ती वादळा सारखी आली..
आणि डोळ्यात पाणी ठेऊन गेली..
एकट्याला सोडून जाण्यासाठी का..?
का तीने मैत्री केली..

तीचे येनं मला कळले नाही..
तीचं जानं मला कळले नाही..
शुद्धीवर आलो तेव्हा कळले..
माझ्याकडे काहीच उरले नाही..
तीच्या साठी झुरायचं..
तीच्या साठी मरायचं..
का असं होतंय..


शेवटी आपणचं आपलं उरायचं..
तीच्या साठी पाहिलेले स्वप्न..
तीच्यावर ठेवलेला विश्वास..
ती सहज तोडून गेली..
एकट्याला सोडून जाण्यासाठी..?
का तीने मैत्री केली..

कस ओळखाव मी काय तुझ्या मनात आहे

कस ओळखाव मी काय तुझ्या मनात आहे

कस कळेल मला काय तुझ्या डोळ्यात आहे.

नजरा मिळवण्या आधीच नजर चुकवतेस तु
कसे ओळखावे कोणते शब्द बंद ओठात आहे.

मी शोधतो जागा माझी सदा तुझ्या भोवताली
पण हे मात्र खर की तु माझ्या काळजात आहे.

सा-या जरी बंद वाटा माझ्या मुक्या शब्दांच्या
परी तु समजुन घे आयुष्य माझ तुझ्यात आहे.

तुला मागुही शकत नाही मी आज तुझ्यापासुन
प्रश्न कोणताच नाही सार काही तुझ्या उत्तरात आहे.

हो आज या नात्याला नाव अस कोणतच नाही
आणि कशाला हव नाव अस काय नावात आहे.

मला फ़क्‍त तु हवी आहेस आणी तुझा श्वास
श्वासाशिवाय जगणा-या काय या देहात आहे.

कधी तरी सागं भावना पोहचल्या मनापर्यंत
कळालच नाही तर काय अर्थ या काव्यात आहे.

Thursday, September 24, 2015

टाईमपास कधी जमलाच नाही....

आपला प्रेम तुला समजलाच नाही..
टाईमपास आपण केलाच नाही ..

वळुन तरबघायचा होता जरा 
आपल्याला आता हसताच येत नाही..

नाका सोडला कट्टा रुसला 

तुझ्या जाण्याने बदल कसा झाला..

उनाड दिवसाच्या टवाळक्या 

आता परत कुणालाच दिसल्या नाही...

आपण असा बदलेल वाटायचं नाही तु बदलवलंस
ग आपल्याला आता आपला काय खरं नाही... 


तसा तर मी मरणार नाही पण
जगण्यातही मजा उरला नाही ..


साला आपल्याला कळलाच नाही आपण
खराखुरा प्रेम केला टाईमपास कधी जमलाच नाही....

Monday, September 14, 2015

माझी चुकी नाही

माझी चुकी नाही कि मी तुझ्याकडे सारखा बघतnराहतो ..
माझी चुकी नाही कि मी तुला सारखा कॉल आणि मेसेज करतो..
माझी चुकी नाही कि मी तुला इतका लाईक करतो...
माझी एवढीच चुकी आहे कि मी तुझ्यावर माझ्यापेक्षा हि खूप खूप खूप जास्त प्रेम करतो...

Friday, September 11, 2015

तर ह्या जगाची सुध्दा मला गरज नाही

पाण्यापेक्षाही खळखळुण तुझ हसन, फुलापेक्षाही नाजुक तुझ लाजण,
मला तुझीच साथ हवी आहे, तुला विसरायचे म्हटले तरी विसरु शकत नाहि,
तुझे स्वप्न पडल्याशिवाय रात्र सरत नाही, आज कळल मला आपले वाटणारे सगळेच मनापासुन आपले नसतात,
त्यांना हवं ते मिळाल की ते आपल्याला सोडुन निघालेले असतात, तुझ्यावर इतक प्रेम करेन की या जगात कोणिच कोणावर केल नसेल,
दुर गेलीस तरी तुझ्या आठवणीत माझ्याशिवाय कोणीच नसेल,
हसतेस एवढी छान की हसत रहायला शिकवलेस तु,
बोलतेस एवढी छान की बोलत रहायला शिकवलेस तु,
जर तुझे स्मितहस्य मला मिळाले तर मला फुलांची गरज नाही,
जर तुझा आवाज मला मिळाला तर मधूर संगिताची मला गरज नाही, जर तु माझ्याशि बोललीस तर दुसर काही ऐकण्याची मला गरज नाही, जर तु माझ्या बरोबर आहेस तर ह्या जगाची सुध्दा मला गरज नाही

प्रेम प्रेम तरी वेगळ काय असत

नेहमीच विचारायची ती मला का प्रेम करतो तू एवढं
सागराच्या खोली एवढं का ओढून घेतो मला सागराच्या लाटा एवढं नेहमीच सांगायची ती मला
हिप्नोटाइज करतोस तू मला स्वप्नातही माझ्या फक्त तूच का दिसतो मला
वाटायच सांगाव तिला अग वेडे प्रेम काय सांगून केले जाते 
बुडायला काय पाणीच लागतं अथांग काय फक्त सागरच असतो
अग त्या लाटाचही प्रेम असतं चंद्रावर चंद्रही भारावतो ह्या लाटाना
म्हणूनच त्याही उफाणतात पोर्णिमा आणि अमावस्येला
प्रेम प्रेम तरी वेगळ काय असत तुझ्या श्वासातच आता माझा श्वास असतो
तुझ्या असण्यातच आता माझं असण असते म्हणूच सांगतो माझं तुझ्यावर प्रेम आहे ह्या सागराच्या अंतापर्यंत

तुझ्यावर प्रेम करण्यासाठी

तुझ्याकड़े पहाण्याचा तो पहिला क्षण
आज मला खुप आठवतो..


तुझ्यासाठी वेडा होणारा तो माझा मन
मला खुप हसवतो..


तुझ ते माझ्या कड़े पाहण
हळूच काहीतरी इशारे करण
माझ्याकड़े बघून हसण..


अचानक नजर फिरवून लाजन
अस वाटत क्षणभर थांबाव तुझ्यासाठी..


तुझ्या त्या प्रेमळ सोबतीसाठी.
तुझ्या सोबत जीवन जगण्यासाठी..


तुझ्यावर प्रेम करण्यासाठी

Thursday, September 3, 2015

खरे प्रेम निभवण, आहे खूप कठीण,

प्रेम करतो हे सांगण, तसे अगदी सोपे आहे, पण खरे प्रेम निभवण, आहे खूप कठीण,
बोलायला तर लोक,...\ सहजच बोलून जातात , ... वेळ येते निभवण्याची खरी, तर म्हणतात आपल्यात, आता दुरीच बरी....... ..!!

स्वप्न

माझं स्वप्न आहे, तुझ्यासोबत जगण्याचं,
हातात हात घेऊन,एकाच दिशेन चालण्याचं, माझं स्वप्न आहे,तुला जवळून पाहण्याचं,
जवळ तुला घेऊन,एकदा मिठीत घेण्याचं,
माझं स्वप्न आहे,तुझ्या सोबत राहण्याचं,
... छोठसं घरट बांधून,त्यात दोघांनीच राहण्याचं,
माझं स्वप्न आहे,तू स्वप्न बघण्याचं, आणि दोघांनी मिळून,ती पूर्ण करण्याचं,
माझं स्वप्न आहे,मी चित्र रेखाटण्याचं,
त्यात रंग भरून,ते तू रंगवण्याचं

फक्त तू

शांत शांत दिसणारी, अन खूप गोड हसणारी... कधी कधी अबोल, तर कधी कधी खूप बोलणारी... कसल्यातरी विचारात, नेहमीच गुंग असणारी... अन कोणाला ही फक्त एक नझर पाहताच, त्याला भुरळ पाडणारी..... ............." तू "............. कोणावरही न चिडणारी, अन सर्वाना समजून घेणारी... स्वतःच दुखः नेहमीच लपवणारी, अन त्या चंद्राला हि फक्त, एकटक पाहत बसणारी .... ............" तू "............ सारयांच्या नकळत, त्या चंद्राला हि वेड लावणारी.. घारया डोळ्यात तुझ्या, त्या चंद्राला हि कैद करणारी... चंद्राला हि तुझ्यात, त्याचीच चांदणी दिसणारी... अन तुझ्या इतकी सुंदर, त्याचीही चांदणी असावी.. अस त्या चंद्राला, नेहमीच वाटायला लावणारी.. ............" तू " ............ .....फक्त आणि फक्त तू..

प्रॉमिस

एक प्रॉमिस माझ्या कडून जेवढे तुलासुख देता येईल तेवढे देईन । काही ही झाले तरी साथ मी फक्त तुला च देईन.. एक प्रॉमिस हवाय तुझ्या कडून असच माझ्या मिठी मध्ये हरवशील असच नेहमी फक्त मला आठवशील । दुखात न कधी रडशील सुखात न कधी मला विसरशील.. एक प्रॉमिस मी नेहमी तुला सुखात ठेवीन एक क्षण सुद्धा माझ्या पासून दूर न करीन । दिलेले प्रॉमिस जीवन भर निभावेन केलेले प्रेम जन्मभर जपेन..

तोच खरा प्रेमाचा वारसदार

सर्वांनाच प्रेम इतक्या सहजा सहजी मिळाल असते तर कुणी प्रेम केलच नसते.. . प्रेम करायला भाग्य लागत ते असच कुणाला हि मिळत नसते... . . कारण ते प्रेम असते स्वतः हून ते कुणासमोर झुकत नसते झुकते ते प्रेम नसते... . काळानुसार ते हि नशिबाची परीक्ष्या घेत असते .. . . त्यात जो पास होतो तोच खरा प्रेमाचा वारसदार असतो ..!!

Saturday, August 29, 2015

एक बहिण असावी..























लहानपणी वाटे,
एक बहिण असावी..
एक गोळी तीला
चिमणीच्या दाताने
तोडून द्यावी,
उरलेली अर्धीही तीलाचं
द्यावी..
एक बहिण असावी..
पाठीशी तीला घालताना
आईची बोलणी खावी,
नंतर मात्र तीलाचं एक ठेऊन
द्यावी..
एक बहिण असावी..
चीडवायला तीला फार
मजा यावी,
पण रडू ती लागताचं
जिवाची घालमेल व्हावी..
एक बहिण असावी..
पहिल्या माझ्या पगारात
तीला छान गिफ्ट आणावी,
आणि गिफ्ट हातात पडताचं तिने
वर पार्टीही उकळावी..
एक बहिण असावी..
असेचं आणि बरेचं नेहमी मला वाटे,
एक बहिण असावी..
पण ?????
मला बहिण का नसावी ?
त्यामुळे भाऊबीज माझी सूनीसुनी जावी..
आणि अचानक
आयुष्यात माझ्या एक
छोटुकली यावी..
सख्खी नसेल तरीही सख्ख्याहून
सख्खी वाटावी..
एक बहिण यावी..
तीच्याशी बोलताना माझीसुःख
दुःखे सांगावी,
सांगता सांगता तीचीही जाणून
घ्यावी..
खरचं घर मुलींशिवाय अपूर्ण
असतं...!!!!.
सर्वांना राखी पौर्णिमेच्या लाख लाख
शुभेच्छा...

Friday, August 28, 2015

एका बहिणीच्या जन्माचे सार्थक झाले..

बालपणी कित्येक क्षुल्लक कारणांवरून भांडलो होते..
कधी तुझी खेळणी.. कधी माझी भातुकली..
रिमोट कंट्रोलची खेचा खेची.. टीवी चॅनेल साठी ..
आत्ता ते सारं पोरकट जरी वाटलं तरी..
तेव्हा जीवन मरणाचा प्रश्न होता..

मग एक दिवस ..
ख़री खुरी भातुकली खेळायला सज्ज उभी मी
आंतरपाटा पलिकडच्या विश्वात गेले..
कोणीतरी तुला कान पिळायला बोलावले..
कुठुनसा तू आलास.. डोळे तुझे लाल..
पेटवलेल्या होमाचा धूर- मला वाटले..
सारं जग रडेल.. पण तू नाही ढाळणार अश्रु..
सोडशील नि:श्वास आणि हसशील मनात..
म्हटलं -
आता बस घेऊन रिमोट- चोविस तास हातात..
मी निघाले माझ्या घरी ..
हक्काचा रिमोट माझ्या हातात असेल..
आईच्या कुशीत शिरत मग रड रड रडले..
पप्पांचे हात तेव्हा डोक्यावरून फ़िरले..
तुला म्हणाले.. 'निघते रे'..
आणि मग ..
तू हमसा हमशी रडत मला बिलगलास..
म्हणत राहीलास.. फक्त..
"भाओजी.. माझ्या दिदीची काळजी घ्याल ना.. "
"भाओजी.. माझ्या दिदीची काळजी घ्याल ना.. "
मी अवाक.. नि:शब्द.. !!!
रडताना तुला पहिल्यांदाच पाहिले..
माझ्यावरचे प्रेम तुझ्या डोळ्यातून वाहिले..
भरून पावले अगदी..तशातही मनात सुखावले...
म्हणाले मनातच... चला..
एका बहिणीच्या जन्माचे सार्थक झाले..
एका बहिणीच्या जन्माचे सार्थक झाले..

यालाच म्हणतात का प्रेम....?

यालाच म्हणतात का प्रेम....? तिच्या आठवनींची वाढत जाणारी नशा, आणि फक्त तिच्या अस्तित्वानेच खुलनारी प्रत्येक दिशा, यालाच म्हणतात का प्रेम....?
तिची क्षणोक्षणी कासावीस करणारी चाहुल, आणि हलुवार मला तिची आठवण करून देणार तीच पैजनाने सजलेल पाउल, यालाच म्हणतात का प्रेम....?
तिचा मी अनुभवलेला बेधुंद श्वास, आणि तिने वेड्या गप रे म्हणाव असा मलाप्रत्येक क्षणी होणारा भास, यालाच म्हणतात का प्रेम....?
तिच्या आठवणीने माझा कासाविस होणारा जीव, आणि सर्वापेक्षा जास्त प्रेम करूनही तिला न येणारी माझी किव, यालाच म्हणतात का प्रेम....?
तिला जाणीव पण न होता माझ्या प्रेमाचाझालेला तिला स्पर्श, आणि हे सर्व वाचून, तिच्या नाजुक ओठावर आलेल्या हास्याचावेड्या अक्षयला झालेला हर्ष, कदाचीत यालाच म्हणत असतील प्रेम....!"

आयुष्यात इतकी येईल कडकी

चार दिसाच प्रेम माझ तिला झाल माझ ओझ सोडुन गेली मला ती शेवटी वाटेवर एकटी मला नव्हत कधी माहिती आयुष्यात इतकी येईल कडकी हो येल विश्वास तिच्यावर माझा साद देईल मनोमिलनाचा कार्यक्रम होईल तेव्हा मी नसेन आयुष्यातुन मी निघुन जाईल

तीने प्रेमाला माझ्या मैत्रीचं नाव

मी ही प्रेम केलेलं तिच्यावर पण तिला नाही ते जाणवलं तीने प्रेमाला माझ्या मैत्रीचं नाव दिल
म्हनाली ..... मित्र राहीलास तर आयुष्यभर पण प्रेम करणार संकटाच्या वेळी साथ देईन पण संसार नाही करणार

इतके प्रेम तुझ्यावर करायचे आहे

आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे कि 
प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरीकमी आहे...!!
आणि तुझ्यात इतके स्वताला सामावायचे आहे की 
आयुष्याला हि वाटावे की आयुष्य किती कमीआहे......!!

प्रेमात पडण म्हणजे काय ?

प्रेमात पडण म्हणजे काय ? प्रेमात पडण म्हणजे काय ? दोन जीवांना लागलेली ओढ की पुन्हा पुन्हा भेटण्याचे वेड दोन देहांचे मधुरमिलन की एकरूप झालेली स्पंदन प्रेम म्हणजे देणगी दैवी प्रेम म्हणजे राग भैरवी प्रेम म्हणजे भेट अमुल्य प्रेम म्हणजे अनुभूती अतुल्य प्रेमात पडलेल पाहून लोक हसतीलही जणू काय प्रेमात नव्हे खड्ड्यात पाडल्यासारख प्रेमात पडलेल पाहून लोक फसतीलही जणू काय प्रेमात नव्हे अड्ड्यात हरल्यासारख हाच बोयफ्रेंड मिळावा म्हणून काहीजणी बाप्पाला नवस बोलतात हीच गर्लफ्रेंड मिळावी म्हणून दीडशहाणे शिकवणी घेत बसतात प्रेम काही बाजारात नाही मिळत विकत आणि जरी मिळाल तरी जास्त नाही टिकत त्यात काय विशेष प्रेम तर पशुपाक्ष्यांनाही होत हेच तर विशेष आहे प्रेम चराचरांत स्थित आहे प्रेमात पडण म्हणजे काय ? दोन जीवांचा जिव्हाळा की एकमेकांना लागलेला लळा दोन मनांचा संगम की स्वप्नसृष्टी विहंगम .

पहिली नजर

पहिली नजर कॉलेजच्या कट्ट्यावर गप्पांच्या गठ्ठ्यावर दंगला होता मित्रांचा ग्रूप रमत नव्हते मन माझे उमगत नव्हते काय करावे कुणास ठाऊक काय शोधत होते वाट कुणाची बघत होते. लेवुनी रूप नवेनवे आले कुठून फुलपाखरू पहिली नजर नजरेला भिडली प्रीतस्पंदने अजूनच आवेगली मनातल्या मनात म्हटले मन वाह! किती सुंदर रूप, किती सुंदर तन जीभ मात्र राहिली चूप हर्षले मन आनंदले खूप. आधी ना घडले कधी उचंबळले ना काळीज कधी पहिल्या पावसाचा पहिलाच थेंब पहिल्या नजरेतल पहिलच प्रेम. गंधित झाला स्वैर वारा रंगीत झाल्या टिमटिम तारा बरसल्या रिमझिम श्रावणधारा पहिल्या नजरेचा पहिला इशारा.

Thursday, August 27, 2015

जगनं माझ तुझ्या हाती

ही वेळ ही कमी पड़तेय रे तुझ्यावर
प्रेम करण्यासाठी 
म्हणून सतत मागतोय तुला
देवाकडे आयुष्यभरासाठी

नाही रे प्रेम करत तुझ्यावर
फक्त आणि फक्त इच्छे साठी 
तूच योग्य आहे
हे सुंदर जीवन आनंदीत जगन्यासाठी

काय करू सांग
ना वेडी तुझ्यासाठी कारण
आहे जगनं माझ तुझ्या हाती 

होशील ना माझी आयुष्यभरासाठी
कारण मला आयुष्य वहायच आहे तुझ्या चरणी
जगले तर तुझ्यासाठी नाही 
म्हणालीस तर तयार आहे मी हे जग सोडण्यासाठी

सार काही तिच्यासाठी

मनाला एकदा आसेच विचारले
का इतका तिच्यात गुंततो ?
नाही ना ती आपल्यासाठी मग का तिच्यासाठी झुरतो ?
कळत नाही तुला त्रास मला भोगावा लागतो आश्रूं मधे भिजून भिजून रात्र मी जागतो.
मी म्हटले मनाला का स्वप्नात रमतो ?
तिच्या सुखा साठी तू का असा दुखात राहतो ?
मन म्हणाले प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा आपण स्वता ला विसरतो सार काही तिच्यासाठी ईतकेच मनाला समजावतो......

तू कधी ना कधी परत येशील.......

तुझा Responce मिळणार नाही हे माहीत असूनही मी मात्र तुझ्यावर प्रेम केले... त्यात माझे काय चुकले ????
कारण..." I Love you " हा माझ्यासाठी प्रश्न नव्हता,
ज्याचे तू मला उत्तर द्यावे, त्या माझ्या Feelings होत्या, आणि त्या तु कधीच समजून नाही घेतल्या...
त्यात तुझे काही चुकले असे ही मी म्हणत नाही, पण... ' माझे काय चुकले ' हे तरी मला सांग.
अजून ही तुझी वाट पाहते या वेड्या आशेने की तू कधी ना कधी परत येशील.......

किती त्रास झाला गं या जीवाला

ठोका या माझ्या हृदयाचा, तुझ्याचसाठी गं राणी धडधडला..
जीव माझा तुझ्यावर मी लावीला, तु मात्र मलाच वेडा ठरविला..!!
ये गं ये राणी तु भेटायला, नाहीतर कसं करमेल या प्रेमवेड्याला..
वाट तुझी बघुनी झालो रडवेला, पापणीत बंद केलं मी वादळाला..!!
आता धीर नाही गं मनाला, सांग सावरु किती मी स्वतःला..
काहीच का गं वाटेना तुला, किती त्रास झाला गं या जीवाला...!!!

Wednesday, August 26, 2015

नाजुकसे हे मन माझे, त्यात वसले प्रेम तुझे

नाजुकसे हे मन माझे, त्यात वसले प्रेम तुझे..
तुझ्याच स्वप्नात कटले, रात्र अनं दिवस माझे..!!
हसतं मन मनात कधी, आठवणींना त्या आठवून..
जपतोय तुझ्या प्रेमाचे, ते प्रत्येक क्षण साठवून..!!
अगं तुही आठव जरा, तो प्रेमाचा गोड वारा.. हवाहवासा वाटतो ना, परत तो थंडीचा गारवा..!!
इथेच तू रोज भेटायची, माझ्यासोबत हसायची.. तासंतास मिठीत घेऊन, गोड गोड तू बोलायची..!!
काहीवेळ जरी दुरावले, प्रेमफुल नाही सोकावले... दिल्या घेतल्या वचनांना, प्रेमाने दोघांनी जोपासले

प्रेमात पडलं की असच व्हायचं !!


प्रेमात पडलं की असच व्हायचं !!
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!
तिचं बोलणं, तिचं हसणं जवळपास नसूनही जवळ असणं;
खटयाळ पावसात चिंब न्हायचं !
जिवणीशी खेळ करीत खोटं रुसणं; अचानक स्वप्नात दिसणं ! माझं काय, तुमचं काय
डावा हात होता की उजवा हात होता?
प्रेमात पडलं की असच व्हायचं !! केसांची बट तिने हळूच मागं सारली ... आपण सारखं आठवतो, प्रत्येक क्षण,
आपण सारखं आठवतो,
मनात आपल्या साठवतो ती रुमाल विसरुन गेली !
विसरुन गेली की ठेवून गेली?

शब्दा वाचून तिला सगळ काही कळते

शब्दा वाचून तिला सगळ काही कळते ती: खूप दिवसा पासून काही तरी विचारायचं होता... विचारू का? तो: permission काय घेतेस... विचार जे विचारायच्या ते... ती: तू रोज कविता का करतोस? तो: मनातल सगळ सांगण्यासाठी... ती: मग कवितेत का रडतोस? तो: माझ एकटे पण विसरण्यासाठी... ती: कशी सुचते रे कविता तुला ? कसे सुचतात रे शब्द ? भिडते रे मनाला कविता तूझी, अन वाचून होते, मी रे स्तब्ध... तो: कशी सुचते ते मला माहित नाही, पण लिहितो मी काही तरी... शब्द नसतात ग त्यात, रचत मी भावनांची रांगोळी ...

Tuesday, August 25, 2015

हेच तर प्रेम असतं ..

खरचं ........... प्रेम म्हणजे काय असतं ?...
तिच्या डोळ्यांतील अश्रु जेव्हा ......... आपल्या डोळ्यांतुन ओघळतातं .... ते प्रेम असतं .......
तुमच्या चेह-यावरील हसु जेव्हा ..... तिच्या गालावरील खळीतुन खुलतं ..... ते प्रेम असतं .......
जेव्हा तिच्या आठवणीच ........ तुमचा श्वास बनतातं ....... ते प्रेम असतं ......
जेव्हा तिच्या येण्याची हलकीशी चाहूल ..... तुमच्या ह्रदयाची स्पंदनं वाढवते ..... ते प्रेम असतं .....
तिच्या काजळ डोळ्यांतील काळजी ..... नकळत सांगुन जाते की ...... या जगात आपलं हक्काचं कुणीतरी आहे ..... ते प्रेम असतं ......
जेथे शब्दांची गरज नसतेच कधी ...... एक ओझरता स्पर्शही खुप काही सांगुन जातो ..... न बोलताच भावना व्यक्त होतात ..... ते प्रेम असतं ......
विरहाचा प्रत्येक क्षण जेथे ...... युगांसमान भासतो ..... ते प्रेम असतं ......
चांदण्या रात्रीतील रेश्मी स्वप्नं ..... दोघांच्या पण डोळ्यांत जन्म घेतातं ..... काही हळुवार क्षणांना दोघंही जिवापाड जपतातं .... ते प्रेम असतं ......
जेथे असतात तिच्या नजरांचे तीक्ष्ण बाण ...... अन् त्यांच अचुक लक्ष्य असतात तुम्ही ..... हेच .......... हेच तर प्रेम असतं ......... !

माझी "ती" अशी असावी...

माझी "ती" अशी असावी माझी "ती" अशी असावी, जगात दूसरी तशी नसावी, मलाच सर्वस्व माननारी, माझी "ती" अशी असावी... प्रानजळ असावी, अवखळ असावी, परी ती अगदी सोज्वळ असावी, सर्वांना अगदी आपलं माननारी, माझी "ती" अशी असावी... फारच सुंदर, फारच गोरी, फारच देखणी पण नसावी, मजवर भरपूर प्रेम करणारी, माझी "ती" अशी असावी... आपली माणसं, आपलं घर, आपलेपणा जपणारी असावी, ससूलाही आई म्हणनारी, माझी "ती" अशी असावी... चाणाक्ष, हुशार, व्यवहारी, आयुष्यातील सल्लागार व्हावी, माझ्या चुका लक्षात घेणारी, माझी "ती" अशी असावी... माया, प्रेम आपुलकी, हे सर्व देणारी असावी, माझी "ती" अशी असावी... माझी "ती" अशी असावी...!!

प्रेम म्हणजे नक्की काय……. ?

"कुणीतरी आवडणं म्हणजे प्रेम की … कोणाच्या डोळ्यात हरउन जाणं म्हणजे प्रेम … कोणालातरी सारखं पाहत रहावसं वाटणं म्हणजे प्रेम की … कोणालातरी विसरता न येणं म्हणजे प्रेम …. कोणाची तरी प्रत्येक गोष्ट आवडणे म्हणजे प्रेम की … आपली आणि कोणाच्या तरी आवडी जुळणे म्हणजे प्रेम … कोणी स्वप्नांत येणं म्हणजे प्रेम की … कोणाच्या सहवासात … स्वप्न जगल्यासारखं वाटणं म्हणजे प्रेम … कोणावर विश्वास ठेवणे म्हणजे प्रेम की …. कोणाचातरी विश्वास कधीच न तोडणे म्हणजे प्रेम …. कुणाला माफ करणे म्हणजे प्रेम की …. कुणाची तरी उगीचच माफी मागणे म्हणजे प्रेम …. कुणाकडून काही घेणं म्हणजे प्रेम की …. न मागता कोणाला काहीतरी देणं म्हणजे प्रेम …. कोणासाठीतरी रडणारं मन म्हणजे प्रेम की …. कुणाच्या तरी आठवणींत हसणारं मन म्हणजे प्रेम …. कोणाशिवाय मरणं म्हणजे प्रेम की … कोणासाठी जगणं म्हणजे प्रेम … कोणासोबत चालणं म्हणजे प्रेम की …. आयुष्यभर कोणासाठी थांबणं म्हणजे प्रेम की …. कुणीतरी सुखात असल्याचा आनंद म्हणजे प्रेम की …. कुणाच्या तरी सोबतीताला आनंद म्हणजेच प्रेम ….."

एकदा तरी मला तू, आपले मानून बघ

खूप प्रेम करतो तुझ्यावर, सत्य हे जाणून बघ,
एकदा तरी मला तू, आपले मानून बघ. 

वाट्टेल ते करेन तुझ्यासाठी, तू फक्त सांगून बघ,
आयुष्भर साथ देईन तुझी, एकदा आपले करून बघ.
तुझ्यासाठीच जगत आहे, तुझ्यावरच मरत आहे,
असला जरी नकार तुझा, तरी तुझ्या होकाराची वाट बघत आहे. 
वाटलेच कधी तुला तर, बघ प्रेम माझे तपासून,
पण मी खरंच खूप प्रेम करतो, तुझ्यावर अगदी मनापासून.....!! घडलेल्या गोष्टी मागे ठेऊन जरा जगून बघ माझ्यासाठी, 
माझे प्रेम हे नेहमी असेच राहीन, मनापासून...फक्त तुझ्यासाठी....!!!!
पाहताक्षणी एखादी व्यक्ति आवडणं हे 'आकर्षण'असतं, परत पहावसं वाटणं हा'मोह'असतो, त्या व्यक्तिच्या जवळून जाण्याची इच्छा असणं ही'ओढ'असते, त्या व्यक्तिला जवळून जाणणं हा'अनुभव' असतो, आणि त्या व्यक्तिला तिच्या गुणदोषांसह स्विकारणं हेच खरं "प्रेम" असतं..

तुझ्यासाठी काहीतरी लिहावे वाटते

कळत नाही मला कसे शब्द उमटावे परंतु वाटते तुझ्यासाठी काहीतरी लिहावे…
तुझ्या पहिल्या भेटीपासून आठवते सर्व काही तुझ्या नाजूक-साजूक गोष्टी आणि अबोल दृश्य काही…

तुझ्या हसण्या-वागण्याने वेड लागले या मनाला तुझ्या मृदू-नाजूक स्वभावाचे बोल सांगेन मी या जगाला…
होत्या सर्व गोष्टी स्वप्नात उतरवल्यास तू त्या प्रत्यक्षात होते सर्व काही गंमतीत झाले त्याचे रुपांतर जंमतीत…
भरू दे सर्व सुख तुझ्या आयुष्यात आणि असाच बहरून राहा माझ्या जीवनात….

खरचं प्रेम करतेस का माझ्यावर, की फक्त मला मित्र मानतेस

रोज काँलजेला जाताना, नजरेला नजर देतेस, मी डोळेभरुन पाहीलं की, नजर चोरत असतेस..... मी काही विचारलं की, अबोला धरुन बसतेस, मी जातो म्हटलो की, थांब ना जरा म्हणतेस..... खरचं प्रेम करतेस का माझ्यावर, की फक्त मला मित्र मानतेस ???
रोज येता जाता वाटेवर, मला मध्येच अडवतेस, तुझ्याशी काही बोलयचयं म्हणत, बोलताना मध्येच अडखळतेस..... मी बोलायला लागलो की, तू फक्त माझ्याकडे पाहतेस, किती छान बोलतोस रे तू, म्हणुन माझं कौतुक करतेस..... खरचं प्रेम करतेस का माझ्यावर, की फक्त मला मित्र मानतेस ???
काँलेजची सुट्टी झाली की, गेटवर माझी वाट पाहत थांबतेस, मी येताना दिसलो की, नजर दुसरीकडे वळवतेस.....
मी जवळ आलो की, जणू मुकीच होऊन जातेस, माझ्याशी बोलायच असतानाही, मुद्दाम गप्प गप्प राहतेस.....
खरचं प्रेम करतेस का माझ्यावर, की फक्त मला मित्र मानतेस ???
मी फोन केला की, नंतर बोलू आपण सांगतेस, अन् थोड्या वेळातच Call करुन, खुप काही बडबडतेस..... मी फोन ठेवतो म्हटलो की, नकट्या रागाने Bye बोलतेस, प्लीज माझ्याशी बोल ना थोडं, म्हणुन तगादा लावतेस..... खरचं प्रेम करतेस का माझ्यावर, की फक्त मला मित्र मानतेस ???
नेहमी माझ्या अवती भोवती, नको तेव्हा फिरकतेस, माझ्याशी बोलण्यासाठी, नको ते कारण शोधतेस..... मी खुप रागावलो की, डोळ्यात आश्रूं आणतेस, मी Sorry म्हटलो की, It's Ok रे होतं असं म्हणतेस.....
खरचं प्रेम करतेस का माझ्यावर, की फक्त मला मित्र मानतेस ???

विचारायचं तुला आज

विचारायचं तुला आज,
माझ्या मैत्रीच्या बंधनाला, आज तू तोडशील का ?
मैत्रीची सीमा झुगारून, पुढच पाऊल ठेवशील का?
खूप सारी मस्ती अन, खूप सारे रुसवे, माझे हे मन मात्र, मलाच आता का फसवे...
नाही म्हटलीस तरी, दोघांमध्ये आहे तितकीच ओढ, मग करुयाना प्रेमाच्या नात्याची, सुरवात अशी गोड...
पूर्वीचा आठवत बसलो कि, हसायला येत मला, कारण मी तुझ्यावर प्रेम करतो हे, सांगू नाही तुला...
आतापरेंत प्रेमासाठी वाटत होता, मैत्रीचा आधार घेऊन तुला छळाव, आजही मी तुझ्यावरच प्रेम करतो, हे कुठून तरी तुला कळाव...
असं म्हणतात,प्रेम हे आंधळ असत, हे खरच असतं , तुझ्या प्रेमात पडल्यापासून, माझा फोन होईल का व्यस्त...
किती दिवस चालू ठेऊ मी, लपाछपी चा हा खेळ, आतातरी होऊदे आपल्या, दोघांच्या प्रेमाचा हा मेळ...
तुला याबद्दल सांगता येत नाहीये, असा सोडशील का हट्ट, आता मी तुला प्रपोज करतोय, हो म्हणून प्रेमाचं नातं कर आपलं घट्ट..

Monday, August 24, 2015

तुझं माझ्यावर प्रेमच नव्हतं...

तुझं माझ्यावर प्रेमच नव्हतं... हे मला सर्व समजत होतं..!
पण तुझ्या खोट्या प्रेमात... मी मनसोक्त वाहत होतो..!
हातात हात घेऊन तुझा, खुप फिरावसं वाटत होतं...
पण तुला मी आवडतच नव्हतो, हे मला कधीचं समजलं होतं..!
खर तर तुझी चुकी नव्हतीच गं, मीच कुठेतरी चुकलो होतो...
विरहात रडायची शिक्षा नको होती गं, मरणाच्या शिक्षेची मी अपेक्षा करत होतो..!
स्वप्नातला राजकुमार भेटला असेल गं तुला, 
पण तुलाच मी माझी स्वप्नपरी मानलं होत...!
मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय... गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस.. रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस.. आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं.. तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस.. मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा.. समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे 'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे.. विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस जाणीवपूर्वक 'नातं ' जप , मध्येच माघार घेऊ नकोस...!
संकटकाळी हात देशील अडचणीत मदत घेशील -
चहाडी चुगली कानावर हात मैत्रीत नसते जातपात !
मैत्रीला लागत नाही कात्री असते मैत्रीत पक्की खात्री -
मित्रात जेव्हां अतूट मैत्री विश्वासाची पक्की खात्री !
उपकार होतील खूप तुझे देवा, एकच मागणे माझे -
एकच मित्र असा मिळावा कृष्ण-सुदामा आदर्श रहावा !

हरवलेली पाखरे

हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला...
गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला.... एकत्र राहून खूप हसलो, खेळलो, शेवटच्या दिवशी मात्र रडलो....
पाहिलं आपण एकमेकांच्या डोळ्यात सजवलेलं गाव, कधीच विसरु नका आपल्या मित्र मैत्रिणीच नाव..
जगाच्या काना-कोपर्यात कुठेही जाऊ, एकमेकांना काही सेकंदासाठी आठवून पाहू.... खरच हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला,
आठवणींतील ते दिवस पुन्हा सजवायला....
पंख नाहीत मला पण उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो..
कमी असलं आयुष्य तरी भरभरून जगतो..
जोडली नाहीत जास्त नाती पण आहेत ती मनापासून जपतो...
आपल्या माणसांवर मात्र मी स्वत:पेक्षा जास्त प्रेमकरतो..
जीवनात एवढ्याहि चुका करू नका कि ..........
पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल आणि ........
रबराला एवढाही वापरू नका कि जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल 
आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो, ज्या त्या काळजीसाठी पात्र आहेत......
कारण........प्रत्येकाला खूश ठेवायला आम्ही काही जोकर नाही......
मित्र बनून प्रियकर बनण सोप्पं..
प्रियकर बनून नवरा बनण हे सुद्धा सोप्पं..
कठिन असत ते
नवरा बनून प्रियकर रहाणं..
आणि
बायकोला मैत्रिणी सारखं समजुन घेणं हे जेव्हा आणि ज्याला जमत
त्या नवऱ्याला सुंदर दिसणाऱ्या मैत्रीणिची
आणि
बायकोला समजुन घेणाऱ्या मित्राची गरजच भासत नाही..

प्रेमात हरलात तरी जीवनात हरु नका

प्रेमात हरलात तरी जीवनात हरु नका,
प्रेमाशिवाय जगण्यात दुख: मानू नका.
सगलेच नसतात नशिबवान,
मरनानंतारही प्रेम मिलन्या इतके भाग्यवान.
कधी कुणाचे ‪#‎प्रेम‬ सोडून जाते,
कधी कुणी स्वतःच प्रेम करायचे विसरते.
स्वतःवर प्रेम करायला शिका,
स्वतःसाठी जगायला शिका.
शोधा जीवनात हरवलेले क्षण,
पुसून टाका दुःखाचे व्रण..
तेव्हा हसेल तुमचे मन,
भासेल सुंदर हे जीवन..

Sunday, August 23, 2015

बहिण

प्रत्येकाला एक बहिण असावी .
मोठी लहान शांत खोडकर कशीही असावी पण एक बहिण असावी .
मोठी असेल तर आई बाबांपासून वाचवणारी ,
लहान असेल तर आपल्या पाठीमागे लपणारी .
मोठी असल्यास गुपचूप आपल्या पाॅकेट मध्ये पैसे ठेवणारी .
लहान असल्यास चुपचाप काढून घेणारी .
लहान असो वा मोठी , छोट्या छोट्या गोष्टी साठी भांडणारी . एक बहिण प्रत्येकाला असावी .
मोठी असल्यास आपलं चुकल्यावर कान ओढणारी .
लहान असल्यास तिचं चुकल्यावर "साॅरी दादा "म्हणणारी.
लहान असो वा मोठी आपल्याला एक बहिण आसावी .
आपल्या एकाद्या मैत्रिणीला "वहिनी " म्हणून हाक मारणारी एक बहिण प्रत्येकाला असावी .
मोठी असल्यास प्रत्येक महिन्याला नवा शर्ट आणणारी ,
लहान असल्यास प्रत्येक पगारात आपल्या खिशाला चंदन लावणारी .
ओवाळणी काय टाकायची हे स्वतः ठरवत असली तरीही तितक्याच ओढीने राखी पसंत करून आणणारी . एक बहिण प्रत्येकाला असावी .
कठीण प्रसंगी खंबीर राहील स्त्री शक्तीच ती , स्वतःपेक्षा हि जास्त आपल्यावर प्रेम करणारी प्रत्येकाला एक बहिण असावी......!
आणि म्हणूनच मुलगी वाचवा देश वाचवा ।
ही पोस्ट शेअर करेल जो भाऊ बहिणीवर प्रेम करतो .
अन् जी बहिण भावावर जीवापेक्षा जास्त प्रेम करते ...

तुझ्या प्रेमात पडलोय

मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय ग़ अजुन ही तुला हे कसे कळत नाही तू नसताना ही तुझ्या आठवणीतच असतो तू असतेस तेव्हा ते प्रेम तुला कसे कळत नाही
कधी पासून प्रेम करतोय तुझ्यावर माझे मलाच ठाऊक नाही पण एवढे मात्र नक्की आहे की आता तुझ्या शिवाय मला काहीच ठाऊक नाही
तू नसतेस पण असे कधी वाटले ही नाही तू असतेस कायम माझ्या मनातल्या घरा तुझा आभासच अधिक सुखावतो मला तुझ्या असण्याहून ही प्रिय आहे जरा
मनातले बोल ओठांवर येत नाही कधी तुझ्या दुरावण्याची भीती उगीच मनी असते तू असतेस तेव्हा बरेच काही बोलायचे असते ते तसेच राहते आणि वेडे मन स्वत:शीच हसते
तुझी प्रतिमाच अधिक बोलते माझ्याशी निदान माझे प्रेम तिला जाणवते तरी पण मन पुन्हा स्वप्नातच रमते जागेपनी प्रेम कळेल माझे तुला ही अन होशील माझी कधी तरी

प्रेमकथांची अखेर..

सगळ्या प्रेमकथांची सुरुवातगोड बोलण्यानंच होते

सगळ्या प्रेमकथांची अखेर
मटार सोलण्यानंच होते!

सगळं गुलाबी वाटत असतं
एकमेकांना प्रेमानं दिलेलं
पाणीही शराबी वाटत असतं
प्रेमकथांची सुरुवात अशीच
पाण्यानंही झिंगून जाण्यानं होते
प्रेमकथांची अखेर मात्र
(तळमजल्यावरून) बादल्या भरून आणण्यानं होते!

'हात' एकमेकांसाठी धरले असतात
दोघंजणं एकमेकांसाठी
राजा-राणी बनले असतात
प्रेमकथांची सुरुवात अशीच
एकमेकांसाठी 'हात' धरण्यानं होते
प्रेमकथांची अखेर मात्र
एकमेकांना झब्बू देण्यानं होते!

जे जे काही कळलं असतं
संसारात त्याच गोष्टींवरून
एकमेकांना छळलं जातं
प्रेमकथांची सुरुवात अशीच
कळूनही न कळण्यानं होते
प्रेमकथांची अखेर मात्र
छळून छळून छळण्यानं होते!

आपल्याला फक्त चुका दिसतात
एकमेकांच्या शब्दांमधे
चाबूक आणि बंदुका दिसतात
जे जे होणार नाही वाटतं
ते ते सारं घडत जातं

प्रेमकथेच्या शेवटी शेवटी
सारं सारं बिघडत जातं!
प्रेमात दोघं असतात तेंव्हा
प्रेमाचा डाव रंगतो तेंव्हा
प्रेमामधे एकमेकांबद्दल
एकमेकांच्या वागण्यामधे